अकोला बाजार येथील नेर अर्बन शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा….!

 

       शेखर इसापूरे

  विभागीय प्रतिनिधी, नागपूर

     दखल न्यूज, भारत 

 

अकोला बाजार:- छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाचं निमित्त साधून अकोला बाजार यासारख्या ग्रामीण भागामध्ये जनसामान्य माणसांना सेवा देण्यासाठी अकोला बाजार येथील नेर अर्बन शाखा चार वर्षांपूर्वी 6/6/2019 रोजी स्थापन करण्यात आली .या शाखेचा चौथा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे हे होते.

 

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्राहकतर्फे लोकमतचे पत्रकार मतीन पठाण व एडवोकेट मनक्षेच सर यांनी संस्थेच्या विकासाबद्दल व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट आचरणाबद्दल आपले विचार व्यक्त केले.सोबतच ग्राहकाने सुद्धा आपले कर्तव्य शिताफीने बजावले पाहिजे व नेर अर्बन या सेवा देणाऱ्या शाखेला सतत सहकार्य केले पाहिजे असेही ते आवर्जून म्हणाले.

     अल्पावधीत अकोला बाजार या शाखेला आठ कोटीच्या आसपास हा निधी उपलब्ध, जवळपास पाच ते सहा कोटी हा कर्ज वाटप आहे व 95 टक्के च्यावर वसुली आहे हे येथील कर्मचाऱ्यांचा जनतेपदी असलेला उत्कृष्ट काम, सोबतच नेर येथील हेड ऑफिसची साथ व संचालक वर्गाचा मार्गदर्शन यांचा सिंहाचा वाटा आहे. यात शंकाच नाही. असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे यांनी केले.

       याप्रसंगी निलेश काळमेघ उप कार्यकारी अधिकारी सुहास नागठाणे, व्यवस्थापक यवतमाळ प्रदीप दुधे वसुली अधिकारी, तसेच अकोला बाजार शाखेचे व्यवस्थापक नितीन बारापत्रे आवर्जून उपस्थित होते.

        याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दैनिक प्रतिनिधी संतोष राठोड , अजय हांगरे , अल्ताफ मंसूरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन बारापत्रे व्यवस्थापक व टीमने खूप खूप मेहनत घेतल.