विज वितरण कंपनीतील त्या कर्मचाऱ्याना त्वरीत कामावर परत घ्या अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

 

उपसंपादक/अशोक खंडारे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणीमध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याना त्वरीत कामावर घेवुन त्यांचेवरील अन्याय दुर करावा अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता विजय मेश्राम यांची भेट घेवुन या बाबतचे लेखी निवेदन त्यांना सुपुर्द केले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गडचिरोली मंडळात विविध विभागात १७ उमेदवार मागील तेरा वर्षापासुन कंत्राटी पध्दतीने कनिष्ठ सहाय्यक या पदावर काम करीत होते. परंतु हे उमेदवार वाणिज्य पदविधारक नाहीत या सबबीवर त्या सर्वांना संबंधीत कंत्राटदाराने तत्कालिन अधिक्षक अभियंता यांच्या आदेशान्वे कामावरून काढुन टाकले. त्यामुळे हे सर्व कर्मचारी आता बेरोजगार झाले असुन त्यांचेवर भयंकर आर्थिक संकट कोसळले आहे. व कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्या सर्व कर्मचाऱ्यानी विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रामाणिमपणे सेवा दिली असुन विविध विभागात महत्वपुर्ण काम केले आहे. वास्तविक कोरोना लॉकडाऊन कालावधीत कोणत्याही कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतांना सुध्दा विद्युत वितरण कंपनीने या कर्मचाऱ्यांना कामावर काढुन अन्याय केला आहे. तरी या सर्व कर्मचाऱ्याना अखंडीत सेवेसह पुर्ववत त्वरीत कामावर घेण्यात यावे व त्यांचेवरील अन्याय दुर करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
या शिष्ठमंडळात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रा.राजन बोरकर, संदीप रहाटे, अशोक खोब्रागडे, क्रिष्णा चौधरी, प्रफुल वासनिक, निखील सहारे, प्रविण बोरकर, हितेश नंदेश्वर, ज्ञानेश्वर जांभुळे आदींचा समावेश होता.