कूरखेडा येथे कोरोनाचा उद्रेक

एकाच दिवशी १२ इसम पॉझिटिव्ह

0
150

कूरखेडा/राकेश चव्हाण प्र
तालूक्यात आज ३१ आगस्ट रोजी कोरोना विस्फोट होत एकाच दिवशी १२ इसमाचे कोरोना अहवाल पाज़ीटिव आल्याने खळबळ माजत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे रिपोर्ट आज आलेल्या १२ पाज़िटिव रूग्नामध्ये यापूर्वी येथील बाजारपेठेतील पाज़िटिव आलेल्या व्यावसायीकाचा कूटूंबातील चार सदस्यासह त्याचा दूकानात काम करणारे दोन कामगार व त्या कामगारांचा संपर्कातील आंधळी येथील पाच अन्य इसम तसेच आपल्या खाजगी कामाने गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे गेलेल्या यूवकाचा समावेश आहे अशी माहिती येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ जयंत पर्वते यानी दिली आहे .सर्व पाज़िटिव रूग्नाना येथे आदिवासी मूलांचा वस्तीगृहात निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये रवानगी करण्याची तयारी सूरू असुन सर्वानी सावधगिरी बाळगली पाहिजे असे आव्हान डॉ पर्वते,पो.नि सुधाकर देडे यानी केले आहे.