शेतात आढळले दोन सख्ख्या भावांचे मृतदेह, डाबका येथील घटना

0
542

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्यातील धारणी येथून 30 किमी अंतरावर दुर असलेल्या दुर्गम भागातील डाबका येथील दोन सख्खे भाऊ मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे
प्राप्त माहितीनुसार डाबका येथील दारासिंह मोती आंबेकर व रामसिंह मोती आंबेकर हि मृत पावलेल्या सख्ख्या भावांची नावे असून दोन्ही भावांचे मृतदेह काळवंडलेले असून दोघांनाही विजेचा धक्का लागून शॉक लागल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे मात्र या वृतास अधिकृत दुजोरा मिळाला नाही
वृत्त लिहेस्तीवर धारणी पोलीस घटनास्थळी पोहचुन तपास करीत होते