सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत घेण्यात आलेल्या सरपंच व सचिव यांचे ” सुजल व स्वच्छ गाव ” या प्रशिक्षण शिबीरासाठी खरेदी केलेले साहित्य व जेवनाचे खर्चात हजारोंचा भ्रष्टाचार.

0
109

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सविस्तर वृत्त असे की, संचालक- पाणी व स्वच्छता वासो, बेलापूर- नवि मुंबई यांचे पत्र क्र. वासो-४/०७१९/प्र. क्र. १५२/मविशा/२०१९-२० दि. २३/१०/२०१९ नुसार ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेल्या पाणी वस्वच्छता सुविधांचा सुरक्षित वापर होण्यासाठी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारने जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील मुख्य भागधारकांच्या क्षमता बांधणीचा उपक्रम सुरु केला असून, हागणदारीमुक्त झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी ODF प्लस आणि सुरक्षित व शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी जल जिवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून, सुजल व स्वच्छ गावांची निर्मिती करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच पाणी व स्वच्छता योजनांमध्ये ग्रामीण भागातील भागधारकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. हा लोकसहभाग सातत्याने राहावा तसेच कार्यक्रमाची अंमलबजावणी विविध टप्प्यांवर होणेस्तव विविध भागधारकांची क्षमता बांधणी होणे आवश्यक असल्याने, सिंदेवाही पंचायत समिती हद्दीतील सरपंच व ग्रामसेवक यांना तिन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींना पुरविण्यात आलेले साहित्य व त्यांना देण्यात आलेले जेवनाचे खर्चात बरीच तफावत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे झालेल्या गैरव्यवहारात हजारोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. कॅटरर्सकडे ६०/- रुपयेत चांगले जेवण मिळते.परंतु जेवणाचा दर ११०/- रुपये प्रती व्यक्ती लावला आहे. नोटपॅड ची किंमत ३५/- प्रति नोटपॅड तर पेनची किंमत प्रती पेन १०/- रुपये लावली. असल्याने शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे सदर व्यवहारात हजारोंचा भ्रष्टाचार झाला हे नाकारता येत नाही. साहित्याचे वा जेवनाचे बिल घेतांना बिलाला रेव्हेन्यू स्टॅंप न लावताच सह्या केल्या आहेत. त्यामुळे सर्व गोष्टीत शंका घेण्यास वाव मिळतो. सदरची माहिती माहिती अधिकारात उपल्ब्ध झाली असून, त्याची वरिष्ठांकडून चौकशी केली जावी, अशी सिंदेवाहीतील जनतेची एकमुखी मागणी आहे.