अवैध दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनासह एकास अटक, ९ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त, डि.बी.पथकाची कारवाई

0
383

 

वणी : परशुराम पोटे

शहरानजीक असलेल्या चिखलगाव येथिल बोधे नगरात गुरुवारी रात्री १०:३० वाजताचे सुमारास अवैधरीत्या देशी दारुची वाहतुक करणाऱ्या वाहनासह एकास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानिक डि.बी.पथाकाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कार्यवाहीत पोलिसांनी ९ लाख २१ हजार तिनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवारी २७ आँगष्ट् रोजी वणी शहरात व परिसरात पोलीस स्टाँपसह गणेश उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करित असतांना खबरीकडून अवैध दारु वाहतुकीबाबत माहिती मिळाली की, बोधे नगर चिखलगाव वणी परिसरात महिंन्द्रा पिकअप क्र.एमएच ४९ डि- ७०६४ मध्ये अवैद्यरीत्या
देशी दारु भरुन आहे. अशा विश्वसनिय माहितीवरुन डि.बी. पथक प्रमुख पोउनि/ गोपाल जाधव हे पथकासह नमुद ठिकाणी पोहचले असता तेथे महिन्द्रा पिकअप उभी दिसली.व आरोपी राजु शंकर आत्राम(२२)रा.गोकुल नगर वणी हा तेथे मिळुन आला.सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी दारुचे बाँक्स भरुन असल्याचे दिसुन आले.त्या बाँक्सची पाहणी केली असता त्यात देशी दारुचे ७७ बाँक्स १८० मि.ली.क्षमतेचे किं.अ.१ लाख ९२ हजार पाचशे तसेच ९० मि.ली.क्षमतेचे ८८ बाँक्स किं.अ.२ लाख २८ हजार आठशे असा एकुन ४ लाख २१ हजार तिनशे आणी दारुची वाहतुक करणे करिता उपयोगात आणलेली महिन्द्रा पिकअप वाहन किं.अं.५ लाख असा एकुन ९ लाख २१ हजार तिनशे रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला. सदर आरोपीने कोरोना संसर्गजन्य रोगाचे प्रादुर्भाव असतांना हयगयाचे करुन जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले.म्हणुन आरोपी विरुद्ध कलम २६९,१८८ भादंवी सहकलम ६५(अ)(ई)८२,८३,मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई सुशिल कुमार नायक पो.उ.वि.अ वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाभव पो.स्टे वणी ,डि.बी.पथक प्रमुख पोउनि/ गोपाल जाधव, पोना/सुनिल खंडागळे,रत्नपाल मोहाडे,अमित पोयाम,पंकज उंबरकर यांनी केली.