सोयाबीनच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; प्रहार चे तहसीलदार कामठी यांना निवेदन

0
145

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी / नागपुर: २८ आँगस्ट २०२०
मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे व खोळकीडी मुळे सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तरी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ आठ दिवसांत पंचनामे करून शासनाकडे सादर करावे ह्या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्ष कामठी विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने कामठी तालुका प्रमुख पंकज ढोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कामठी यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख श्रीकांत ठाकरे, वृषभ अटारकर, गणेश करडभाजने,चेतन ढोरे उपस्थित होते
आठ दिवसांत पंचनामे न झाल्यास सोयाबीन जलावो आंदोलन करण्यात येईल