अभिनव उपक्रमासह गणेशोत्सव साजरा

0
88

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. या काळात परीक्षा रद्द, शाळा- महाविद्यालय बंद, दुकान बंद, धार्मिक स्थळे बंद, धार्मिक कार्यक्रम बंद ,मास्क, हँडवॉश, इत्यादी नवनवीन गोष्टींचा अनुभव प्रथमतः 2020 मध्ये आला. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव कसासाजरा करता येईल ? यापुढे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शासनाने काही नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली.
मालेवाडा गावात श्री. साई गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी हा सण साजरा केला जातो. यावर्षीही शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आरती करण्याकरिता एक मीटरच्या अंतरावर चौकोनी कठडे बनवून वैयक्तिक अंतराचे भान ठेवले जाते. तसेच एका बाजूला हँडवॉश, सॅनीटायझर व पाणी ठेवून गणेश भक्तांना कोरोना विषाणूपासून भयमुक्त केले जाते. यामुळे नागरिक निर्धोकपणे येथे येऊन बाप्पांचे दर्शन घेऊ शकतात.
यासाठी उमेश नंदनवार (अध्यक्ष,) केशव दरवडे (कोषाध्यक्ष), सुभाष गुंडरे(सचिव), गोपाळ शेंडे, दुकालू दमगरा, यशपाल गेडाम, रुषी घरते, दिनेश धुर्वे ,शेखर सयाम,अमोल सयाम, करण सयाम, मनोज वालदे, बुरबांदे टेलर, अजय बिंजवे, किशोर सलाम ,आकाश सयाम ,प्रमोद सयाम इत्यादी सदस्यगण यांचे मोलाचे श्रेय आहे.