अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच! सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

0
125

 

निलेश आखाडे.
उपसंपादक,
दखल न्यूज भारत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशभर निर्माण झालेली परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे राज्यसरकारने स्पष्ट केले होते. मात्र यूजीसी ने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती अनेक विद्यार्थी संघटनांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द व्हाव्यात अशी मागणी करीत कोर्टात धाव घेतली होती. अत्ता शेवटच्या वर्षांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला असून आज त्यावर सुनावणी पार पडली.

दखल न्यूज भारत