नवेगाव बांध जलाशय ओव्हरप्लो,आता प्रतीक्षा इटियाडोह धरणाची

0
149

 

दखल न्युज भारत: बिंबिसार शहारे

अर्जुनी मोर, दि.२८/०८/२०२०:
तालुक्याचे भुषण असलेला राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध येथील जलाशय आज २८ आॅगष्टला सकाळी साडेसहा वाजता ओव्हरप्लो झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील दुसरे सिंचनाचे वैभव ईटियाडोह धरण कधी ओव्हरफ्लो होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या अर्जुनी मोर. तालुक्यात नवेगाव बांध जलाशय व इटियाडोह धरण निसर्गप्रेमीचे आवडीचे पर्यटनस्थळ आहे. मागील वर्षीपासुन तालुक्यातील दोन्ही धरणे ओव्हरप्लो होत असल्याने निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या स्थळी गर्दी करतात.अत्यल्प पावसामुळे सन २०१३ पासुन नवेगाव बांध जलाशय व इटियाडोह धरण ओव्हरप्लो झाले नव्हते. पाच ते सहा वर्षानंतर मागील वर्षी नवेगाव बांध जलाशय ३० ऑगस्ट ला तर इटियाडोह धरण ३ सप्टेंबर ला ओव्हरप्लो झाले होते.
यावर्षी तालुक्यात उशिरा का होईना पण समाधानकारक पाऊस येणे सुरु झाल्याने आज २८ आॅगष्ट ला सकाळी साडेसहा वाजता नवेगाव बांध जलाशय ओव्हरप्लो झाला. अशाच पध्दतीचा समाधानकारक पाऊस आलाच तर दोन ते तीन दिवसात इटियाडोह धरण ओव्हरप्लो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईटियाडोह धरणात ८२.४१ टक्के पाणीसाठा
उशिरा का होईना वरुणराजा बरसला सध्या स्थितीत ईटियाडोह धरण गोठणगावं येथे ८३५.३० फूट तर ८२.४१ टक्के पाणीसाठा झाला आहे,त्यामुळे गोंदिया भंडारा व गडचिरोली अशा तिन्ही जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार जलाशय पातळी 835.30 फूट व 254.59 मिटर,उपयुक्त पाणीसाठा 261.96 दलघमी पूर्ण साठा 325.67 दलघमी तर एकूण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 82.41.% इतकी झाली आहे.