श्री गणेश विसर्जन काली मंदीर घाटा वर कृत्रिम तलावात नियमानुसार गणेश विर्सजन होणार । नगराध्यक्ष करूणा आष्टनकर यांची माहीती

0
136

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प्र): – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असल्याने या कोरोना महामारी संकटात व धरणाच्या विसर्गाने नदी पात्रात पुर परिस्थिती असल्याने क न्हान व परिसरातील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कन्हान नदीच्या काली माता मंदीर घाटावर नागरिकांना व्यवस्थित करता यावे. सध्याकाळी ६ वाजेपर्यंत व नियमाचे पालन करण्याकरिता नदी घाटा वर कडक बंदोबस्त आणि व्यवस्था नगर परिषदे व्दारे करण्यात यावी अशी माग णी निवेदन देऊन करण्यात आली.
या वर्षी पेंच व तोतलाडोह धरणे भरून असल्याने मध्यप्रदेशात होणा-या पाऊसाने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग नदीत होत असल्याने कन्हान नदीपात्रात पुरपरिस्थी ती असते. तसेच
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित कन्हान ला गणेश मुर्ती स्थापन करून कोरोना हद्दपार करण्याकरिता श्री गणेश मुर्ती स्थापन करून १० दिवस पुजा अर्चना भाविक करित आहे.
शनिवार (दि.२२) ला कन्हान शहर व ग्रामिण परिरातील ३० गावा पैकी सार्वजनिक गणेश मंडळाने शहरात ४, ग्रामिण १० असे १४ तर घरघुती ६२१ श्री गणेश मुर्ती स्थापन करून संपुर्ण मानवाच्या कल्याणार्थ कोविड-१९ ( कोरोना विषाषु ) महामारी चे संकंट हद्दपार करण्याकरि ता विघ्नहर्ता, सुखकर्ता श्री गणेशा ला साकडे घालुन भाविक मंडळी शासना च्या नियमाचे पालन करून शांतेत गर्दी न करता १० दिवस मनोभावे पुजा अर्चना करून श्री गणेश उत्सव साजरा करित आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असल्याने या महामारी संकटात श्रीगणेश उत्सव शांते त संपन्न करण्याकरिता कन्हान शहर व परिसरातील सार्वजनिक व घरघुती श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कन्हान नदीच्या काली माता मंदीर घाटावर दि. १ ते ३ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त आणि नियमाचे पालन करून करण्याकरिता नगरपरिषदे मार्फत विसर्जन घाटावर कटघरे, विधृत, स्वयंसेवक, कृत्रिम तलाव, माहीती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था कर ण्यात यावी जेणे करून उत्सव शांती व सुव्यवस्थीत संपन्न करता येईल. अशी आग्रही मागणी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या नेतुत्वात नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हया ना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदन स्वीकार करून तुरंत अमलात आणुन याप्रसंगी कन्हान ने पोलिस निरिक्षक अरूण त्रिपाठी व सहकर्मी, नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, नगरसेवक विनय यादव, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, नितिन मेश्राम, शाहरुख खान, सुतेश मारबते, चिंटु वाकुडकर आदी प्रामुख्याने उपस्थि त होते.