अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादलेल्या प्रकरणातील, एका आरोपीस शोधून काढण्यात पोलिसांना यश. तीन दिवसांचा घेतला पीसीआर

152

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची ःदि 28ऑगस्ट-
आदिवासी अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादलेला बाप कोन या मथळ्याखाली बातम्या वृतपत्रावर प्रकाशित झाल्या होत्या, त्या बातमीची दखल घेत कोरची पोलीसांनी 24 ऑगस्ट ला अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी 376(2)(जे) सह पोस्टस 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु बाप सापडला नाही. गावातील चर्चेनुसार बाप गावातच आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी आणि फिर्यादी अधिकारी आनंद श्रीमंगल याना दाखल गुन्हयाबाबत काय प्रगती आहे असे विचारले असता, आपण आमचे वरिष्ठ आहात काय? असा प्रश्न केला. त्यामुळे सदर गुन्हयाबाबत स्थानिक पोलिस एवढी गोपनीयता का बाळगते? असा प्रश्न निर्माण होत होता.
अल्पवयीन मुलीला गडचिरोलीला बालन्यायालयात घेउन गेले असून मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात 3ते4 लोकांचे बयान नोंदविण्याचे समजते. पण 48 तास लोटूनही अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादलेला बाप शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नव्हते. या बाबत गावात उलटसुलट चर्चा होत्या पण काल किरण अग्रवाल (वय 38 वर्ष )नावाचे इसमास या संदर्भात अटक करून तीन दिवसांचा पीसीआर घेतला असल्याचे sdpo जयदत्त भवर यांनी मोबाईल वर सांगितले.अधिक तपास जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनात कोरची चे ठाणेदार करीत असल्याचे समजते.