26 आगस्टला सि -60 कमांडो- नक्षल झालेल्या चकमकीत ठार झालेली महिला नक्षली होती इंदिरा कोरामी शासनाने तिच्यावर ठेवले होते सहा लाखांचे बक्षिस नक्षली महिला धानोरा तालुक्यातील पोलिस अधीक्षकांनी केले सी – ६० कमांडोंचे अभिनंदन

0
147

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

गडचिरोली :
नक्षल चळवळीचा सफाया करण्यासाठी स्पेशल सि- 60 कमांडो नेहमीच अग्रेसर भूमिका बजावतात. कठोर प्रशिक्षितपणामुळे ते विविध कठिण परिस्थितीत आपले कार्य सुव्यवस्थित पार पाडत असतात.
या पार्श्वभूमीवर जारावंडी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोलदा जंगल परिसरात काल 26 ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेली महिला नक्षली चातगाव दलमची सदस्य इंदिरा उर्फ मेस्सी सैनु कोरामी (21) ही असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंदिरा ही धानोरा तालुक्यातील कर्रेम पो. जारावंडी येथील रहिवासी होती. 2012 मध्ये तिने नक्षली चळवळीत प्रवेश केला. 2019 पर्यंत ती प्लाटून दलम 3मध्ये सदस्य म्हणून कार्य करीत होती. यानंतर 2019 ते 26 ऑगस्ट पर्यंत चातगाव दलम सदस्य पदावर होती. तिच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये 1 खून, 25 चकमक व इती 3 असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने 6 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. चकमकीत या महिला नक्षलीला कंठस्नान घालणाऱ्या सी – 60 जवानांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे.