६ वर्षापासून पंचायत समिती आरमोरी येथील एम आर इ जी एस विभागातील रीक्त असलेली स्थापत्य तांत्रिक अधिकारी पदाची जागा तातडीनं भरण्यात यावी… गोंडवाना गोटुल समीती तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच विश्वेश्वर दर्रो यांची मागणी…

0
119

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

पंचायत समिती आरमोरी येथे एम आर जी ए विभागात गेल्या ६ ते ७ वर्षापासून स्थापत्य तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे संपूर्ण आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या कामाच्या नियोजन आराखड्यातील प्रस्तावित कामे होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. जवळपास ६ ते ७ वर्षापासून पंचायत समिती आरमोरी येथे स्थापत्य तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकंदर विचार केला तर आरमोरी तालुक्यात मातिकामा व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करण्यासाठी भिषण समस्या निर्माण झालेली आहे. गुरांचे गोठे, शेळ्यांचे शेडस् बांधकाम असोत वा इतर कुठलेही काम मंजुरीसाठी तांत्रिक अधिकारी यांनी इस्टिमेट बनवावा लागतो. पण सदर काम करायला स्थापत्य तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे आजपर्यंत संपूर्ण तालुक्यात एकही गुरांचं गोठ्याच बांधकाम मंजुर झालेल नाही. त्यामुळे अनेक योजना उपलब्ध असुनही शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ लाभार्थांना घेता येत नाही. सदर योजना कुचकामी ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या विविध कामाचा नियोजन आराखडा निकामी ठरत आहे. शिवाय ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सर्वसामान्य जनतेचे अत्यावश्यक प्रश्न सोडविने कठीण झाले असुन अनेक अडथळे समोर येत आहेत. तरी प्रशासनांनी वरील गंभीर बाब लक्षात घेता पंचायत समिती आरमोरी येथील स्थापत्य तांत्रिक अधिकारी पदाची रीक्त जागा तातडीनं भरली जावी. अशी रास्त मागणी विश्वेश्वर दर्रो गोंडवाना गोटुल समीती तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच ग्रामपंचायत सिर्सी यांनी केली आहे.