चंद्रपूर वीज केंद्र वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकली ठार… कुटुंबावर पसरली शोककळा तर परिसरात भितिचे वातावरण…

0
183

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

चंद्रपूर :- येथील महाऔष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला. उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. यात लावण्या जखमी झाली. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आहे. ५ वर्षाच्या चिमुकली अकस्मात सोडुन गेल्याने आई वडीलांना दुखद हादरा बसला असुन कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वीज केंद्र वसाहतीत बिबट आल्याने परिसरात दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे.