नोकरीचे आमिष देऊन बेरोजगार युवकांची लाखो रुपयाची फसवणूक फसवणूक झालेल्या मुलाच्या वडिलांनी वर्धा नदित केली आत्महत्या

0
217

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील प्रदीप राजु आसेकर (२६)हा युवक पॉलीटेक्निक झाला असून तो व त्याचा भाऊ नौकरीच्या शोधात असताना त्यांची ओळख गणेश सहारे रा.भद्रावती यांचेशी 2016 मधे झाली. गणेशला भेटायला तो भद्रावती येथे गेला व नोकरी लावून देण्या बाबत चर्चा झाली असता त्याने माझी ओळख किशोर गुलाब जगताप रा.वरोरा यांचेशी आहे व तो वनविभाग, सामान्य रुग्णालय तसेच नगरपरिषद या ठिकाणी पैसे घेऊन सरकारी नौकरी लावुन देतो व जाॅब प्लेसमेंट नावाचे आमचे एक कार्यालय आहे असे सांगीतले.एक महिण्यानंतर प्रदीप आसेकर व त्याचे वडील गणेश सहारे सोबत किशोर जगताप यास कार्यालया मध्ये भेटायला गेले असता तो म्हणाला कि लाॅरेन्स नावाचा एक व्यक्ती आहे त्याची चांगली ओळख असून त्याची जाॅब प्लेसमेंट देण्याकरीता एक कंपनी आहे.
त्यांनी वनविभागात नौकरी लावुन देण्याकरीता ४ लाख ५० हजार व लहान भाऊ निखीलला नागपूर येथे महाजनको या ठिकाणी नौकरी लावण्या करीता १० लाख रुपयाची मागणी केली. बेरोजगार युवकांच्या वडीलाने पैश्याची जुळवा जुळव करण्यासाठी करंजी येथील ४.५ एकर शेती १४ लाख रुपयात विकली व त्यातील ५ लाख रुपये प्रदीप व त्याच्या वडीलाने वरोरा येथे जाऊन किशोर जगताप व गणेश सहारे यांना दिले.त्यानंतर गणेश सहारे यास २ लाख रुपयाचा धनादेश दिला.असे एकूण २३ लाख ५० हजार त्यांच्या कडुन त्या भामट्यांनी घेतले.मात्र नौकरी लावून दिली नाही यामुळे या युवकांनी वारंवार नौकरी चा तागदा लावला असता उडवा उडवीचे उत्तर देत ४ वर्षाच्या कालखंडात हे भामटे भुमीगत झाले .
शेवटी त्रस्त होऊन दिनांक १४/७/२०२० ला वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता कलम ४२०(३४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही यामुळे वडील राजू आसेकर हे नैराश्यात होते .दिनांक 26 आगस्ट 2020 ला आसेकर हे घरून निघून गेले त्याची शोधाशोध केली असता वर्धा नदीच्या बेलोरा घाट पाणी टाकी जवळ दूरध्वनी,चप्पल व पैसे ठेऊन असल्याचे पोलिसांनी सांगितले परंतु त्यांचा शोध लागला नाही यामुळे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असता पोलिसांनी मिसींग ची केस दाखल केली व ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभागा कडून बोट बोलावून घेतली. बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मते, उमेश बनकर, समीर चापले, गिरीश मराने, विक्की खांडेकर, सुजित मोगरे व चव्हाण यांनी बेलोरा घाटाच्या पाणी टाकी पासून शोध मोहीम राबविली परंतु त्यांचा काही शोध लागला नाही. शेवटी नकोड़ा घाटावरिल राम मंदिरा जवळ वडील राजू आसेकर यांचे पार्थिव शरीर आढळून आले. फसवणूक व पैसा बुडल्या च्या धक्का सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करल्या ची चर्चा परिसरात आहे.