आसा गाव अंधारात… आसा गावातील विज पुरवठा दोन महिन्यांपासून खंडित

0
110

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:-अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कमलापूर अंतर्गत येणाऱ्या आशा हे गाव अति दुर्गम भागातील गाव आहे.
आसा या गावातील विज पुरवठा दोन महिन्यापासून खंडित असल्यामुळे येथील नागरिकांचे जीवन अंधारात घालावे लागत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्री साप, विंचू जंगली प्राणी असे विषयुक्त प्राण्यांचे वावर जास्त असतो.असे प्राणी कोणाला कधी डंख मारतील अशी भीती आसा वासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.
आज भारतात डिजिटल इंडिया चे वारा वाहत असताना गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यातील परिस्थिती दयनीय अवस्था आहे.कुठे रस्ता नाही तर कुठे विज नाही कुठे पाणी नाही अशी परिस्थिती आहे. जनप्रतिनिधींनी व संबंधित विभागाने आसा गावातील विजेची समस्या लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मनोगत आसावासीयांनी व्यक्त करीत आहेत.