हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वरदाडे गावात स्थापना करण्यात आली. विठ्ठल ठाकर सरपंच

0
109

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
वरदाडे गावामध्ये वरदाडे-वसवेवाडी ग्रामपंचायत यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून व सरपंच विठ्ठल ठाकर यांच्या पुढाकारातुन तसेच.मा.सरपंच सौ .वंदना शेडे, मा.सरपंच,प्रीती शेडे,लता जावळकर उपसरपंच दिलीप भालेराव,सूरेखा यादव ग्रामसेवक शिल्पाजी कांबळे वरदाडे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापन केली,महाराजांच्या स्मारकाच भूमिपूजन एक वर्षापुर्वी झालं होतं. वरदाडे हे गाव सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात ,सिंहगड च्या कुशीत आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती शूरवीर बाजी पासलकर यांच्या मोसे खोऱ्याला लागूनच आहे. अशा या पावन भूमीत श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शिवाजी राजांची मूर्ती स्थापना झाली. या सारखा भाग्याचा दिवस नाही. हा कार्यक्रम करताना सोशल डिस्टनसिंग ची पूर्ण काळजी घेतली गेलीे मा.सरपंच पै.संभाजी शेडे, ह.भ.प.सचिन शेडे, पै.अमोल जावळकर, दत्ता पवार, बाळासाहेब शेडे, सागर शेडे, विकास रेणुसे, महेश दळवी, अतुल करंजावणे ,संतोष दळवी ,अमित दळवी, ह.भ.प.गणपत महाराज ठाकर, शिवाजी अण्णा शेडे, श्रीपती लोहकरे यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पाडला,समस्त वरदाडे ग्रामस्थ,व जनसेवा तरुण मंडळ यांचे सहकार्य लाभले.