निमलगुडम गावातील विद्युत पुरवठा खांब वाकुन आहेत. भविष्यात धोका होण्याचे श्यकता नाकारता येणार नाही

0
95

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- अहेरी तालुक्यातील तिमरम ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या निमलगुडम(तिमरम म.)गावातील विद्युत खांब पूर्णपणे रस्त्याच्या कडेला वाकुन आहेत.
गावात विद्युत पुरवठा 25-30 वर्षांपूर्वी केलेली असुन काही खांब जीर्ण अवस्थेत झाल्याने गावातील रस्त्याच्या बाजूला वाकलेले असल्याने नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यता जि.प.शाळेजवळील दोन खांब आणि शेवटच्या टोकावर लावलेल्या खांब खुप धोकादायक वाकुन जिवंत विद्युत तार लोंबत आहे.
रस्त्याने जाता-येता, शाळेतील विद्यार्थी जाता-येता काही अनुचित प्रकार घडण्याचे श्यकता नाकारता येणार नाही अशी गावातील नागरिकांना भीती निर्माण झाली आहे.या प्रकाराकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करून चालणार नाही करिता विद्युत पुरवठा विभागाने या समस्या कडे लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी श्री नागेश शिरलावार, राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, साईनाथ मडावी, सखाराम तलांडी,राकेश बामनकर, आनंदराव कोडापे, सुनील सोयाम आणि विद्यार्थ्यांच्या पालक व गावातील नागरिक करीत आहेत.