भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी डॉ.नेपाल रंगारी यांची निवड

0
134

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.सुधाकर भालेराव,व प्रदेश महामंत्री रविंद्र चव्हाण यांनी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली.यात भंडारा जिल्ह्याचे दमदार नेतृत्व करणारे जि.प.सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांची चिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
डॉ.रंगारी यांची १५ ऑक्टोबर २०१५ ला तालुका अध्यक्ष पदी निवड केली होती.तालुक्यातील त्यांचे उत्कृष्ट संघटन कार्य बघता तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी यांनी ऑक्टोबर २०१७ ला डॉ.रंगारी यांना अ.जा.मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी विराजमान केले.तेथुनच डॉ.रंगारी यांच्या स्वभावातुन संपुर्ण जिल्हाभर कार्यर्कत्यांचा ओघ सरसावला व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावागावात विशेष मोर्चेबांधणी सुरू केली . तसेच जिल्ह्यात अनुसूचित जाती मोर्चा चे १० मंडळे असुन सर्व मंडळातील कार्यकारणी जिल्हाभरात रितसर गठबांधनी केली.यात अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष सुभाष पारधी व संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोरेकर यांचे मोलाचे योगदान आहे.
या निवडीचे श्रेय माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे, भंडारा-गोंदिया विधानपरिषद आमदार डॉ.परिणय फुके, माजी आमदार बाळा भाऊ काशीवार,व सुभाष पारधी यांना दिले असून या निवडीबद्दल अनुसूचित जाती महामंत्री सुरेश गजभिये, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष जगन उके, भाजपा शहर अध्यक्ष किशोर पोगडे, हंसराज वैद्य, रणजित कोटांगले, मंगेश मेश्राम, हेमंत देशमुख , शेषराव वंजारी, चंद्रकांत वडीचार सर्व भाजपा, भाजयुमो,व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.