मेक इन गडचिरोली गोंडवाना अगरबत्ती क्लस्टर च्या उद्योजकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते १ कोटी ७० हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र बँकेचे आर्थिक सहकार्य

0
107

उपसंपादक/अशोक खंडारे

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मेक इन गडचिरोली च्या गोंडवाना अगरबत्ती क्लस्टर उद्योजकाना १ कोटी ७० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या हस्ते, आमदार डॉक्टर देवराव होळी व बँकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देण्यात आला
याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर संजीव कलवले, गडचिरोली शाखेचे व्यवस्थापक दिनेश सिंगला, सुशील कुमार, चौधरी, नाबार्ड चे डी डी एम राजेंद्र चौधरी, अग्रणी बँकेचे एल.डी. एम. आनंद बोरकर,जिल्हा उद्योग केंद्राचे विश्वनाथ बोंबे, मेक इन गडचिरोली चे प्रोग्राम मॅनेजर श्रीनिवास प्रामुख्याने उपस्थित होते. गोंडवाना अगरबत्ती क्लस्टरचे संचालक हेमंत बोरकुटे,वैशाली हुस्के, निर्मलाताई कोटावार यांनी सर्वांच्या वतीने धनादेश स्वीकारला
तसेच चामोर्शी येथे आयोजित गुगल मिट कार्यक्रमात पुन्हा 13 अगरबत्ती उद्योजक यांना उद्योगा करिता चामोर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक चौधरी यांच्या शुभ हस्ते कर्ज मंजूर पत्र वाटप करण्यात आले
जिल्हा वासियांना गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आजचे चेक वाटप हे मेक इन गडचिरोली चे मोठे यश असल्याचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी चेक प्राप्त उद्योजकांना म्हटले असून यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र बँकेच्या ,झोनल मॅनेजर गडचिरोली शाखा मॅनेजर , चामोर्शी येथील शाखा व्यवस्थापक यांचे विशेष आभार मानले आहे. या पैशाचा उपयोग समस्त नव उद्योजकांनी आपला उद्योग व्यवसाय वाढीसाठी चांगल्या प्रकारे करावा ,स्वतः उद्योजक बनल्यानंतर इतरांना रोजगार द्यावा , असे आव्हान मेक इन गडचिरोली चे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी केले आहे.