जेईई-नीटच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात; चिपळूण काँग्रेसचे शिष्टमंडळ शुक्रवारी प्रांतांना देणार निवेदन; काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांची माहिती

0
68

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.
चिपळूण : केंद्र शासनाने कोरोनाच्या संकटातही JEE- NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने चिपळूण काँग्रेसच्यावतीने शुक्रवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता येथील प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की,आपला देश कोरोना विरोधातील लढाई लढत असताना केंद्रशासनाने JEE-NEET परीक्षा घेण्याचा असंवेदनशील आणि अविचारी निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात या परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. कारण कोरोना संसर्गाची विद्यार्थी आणि पालकांना भीती आहे. तसेच कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मर्यादीत वाहतूक आणि राहण्याची सोय यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे दिवसेंदिवस कठीण जाईल यात शंका नाही. कोरोना संकटाच्या काळात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आसाम आणि बिहारसारख्या राज्यातील भीषण पुर परिस्थितीमुळे त्या राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या चिंतेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष यांनी नुकतेच विरोधी मुख्यमंत्र्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक घेतली. केंद्र सरकारच्या या निर्णयाला एकत्रितपणे विरोध करावा लागेल. याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णयही ही त्यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या चिंता लक्षात घेऊन JEE-NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की, JEE-NEET ची परीक्षा महत्वाची असली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि भविष्याची चिंता आहे. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीची खरी चिंता आहे. साथीच्या रोगादरम्यान वाहतूक आणि निवास; आसाम आणि बिहार मध्ये पूरग्रस्त जिओआयने सर्व भागधारकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि स्वीकारार्ह उपाय शोधला पाहिजे असे म्हणणे मांडले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या एकतर्फी निर्णयाविरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने बेमुदत उपोषण केले आहे. या अनुषंगाने शुक्रवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र मध्ये काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली चिपळूण काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी येथील प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती ती शेवटी प्रशांत यादव यांनी दिली आहे यावेळी काँग्रेसचे बेसिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक सेल पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले आहे.

दखल न्यूज भारत