आरमोरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित असलेले प्रवास भत्ता व मानधन दया- संघटनेची मागणी

0
160

 

देवानंद जांभुळकर उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी :-

तालुक्यातील ग्रामरोजगार संघटनेतर्फे 17/8/2020ला संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते परंतु आज तोवर आठ दिवस लोटून सुद्धा सदर निवेदनातील मागण्याबाबत प्रशासनाची कोणतीही कारवाई न केल्यामुळे ग्रामरोजगार सेवक यांच्या कुटुंबावर आर्थिक मानसिक त्रास होऊन राहिलेला आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा यज्ञ प्रश्न ग्राम रोजगार सेवकासमोर निर्माण झालेला आहे

संघटनेने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदनाद्वारे कळवले आहे की ग्रामरोजगार सेवकाचे मागील थकबाकी असलेल्या प्रवास भत्ता व मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत 26/8/ 2020 पासून संघटनेतर्फे मनरेगाअंतर्गत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येत आहे असे संघटनेतर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली याना कळविले आहे.याकडे जिल्हाधिकारी काय लक्ष घेतात याचे तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचे लक्ष आहे