आम आदमी पक्षातर्फे तुकाराम मुंडे च्या बदली विरोधात नागपुरात निषेध आंदोलन

0
781

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

संविधान चौक / नागपुर: २७ आँगस्ट २०२०
मनपा आयुक्त तुकाराम मुंडे नागपूर ह्यांची बदली तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावी ह्या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे आज दिनांक २७/०८/२०२० रोजी ४ वाजता संविधान चौक येथे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.
उपस्थित पदाधिकाऱ्यां मार्फत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ह्यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे. निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांना त्यांनी केलेल्या कार्याची माहिती, महानगरपालिका येथील सत्ताधारी आणि विपक्ष ह्यांनी कश्याप्रकारे कटकारस्थान रचून त्यांना त्रास देण्यात आला? हे कळविण्यात आले.
नागपुर शहराला एक चांगले कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी म्हणून मनपा आयुक्त मा. तुकाराम मुंडे एक प्रामाणिक अधिकारी मिळाले होते, यांच्या मुळे नागपुर शहरात स्वच्छतेपासुन ते कोरोना नियंत्रण करण्यापर्यंत यांनी यश मिळविले होते. नागपुर ला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी श्री मुंडे यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची आज नितांत गरज आहे. नागपुरात मनपाचे चांगले रुग्णालय बनाविन्यासाठी, ड्रेनेज सफाई, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, आर्थिक शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आज नागपुरात श्री मुंडे ह्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधारी बीजेपी आणि कांग्रेस पक्षाने एकत्रित येवून नगरसेवक, आमदार, खासदार श्री मुंडे यांच्या बदली करण्यासाठी मागे लागले होते. आम आदमी पार्टी, नागपुर ह्यांच्या तर्फे राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांना मागणी केली की, आयुक्त श्री. मुंडे ह्यांची बदली तात्काळ प्रभावाने रद्द करावी, अन्यथा नागपुर ची जनता रस्त्यावर येवून जन आन्दोलन उभे करेल.
आज झालेल्या आंदोलनात महापौर संदीप जोशी मुर्दाबाद, संदीप जोशी होश मे आओ, महाराष्ट्र आघाडी सरकार होश में आओ, मुंडे जी का तबादला वापस लो, सारख्या घोषणा देण्यात आल्या. आजच्या आंदोलनात आम आदमी पार्टी विदर्भ व राज्य समिति सदस्य संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले व नीलेश गोयल, युवा राज्य समिती सदस्य कृतल वेलेकर, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, नागपुर युवा संयोजक गिरीश तीतरमारे, हरीश गुरानी, संजय सिंह, आकाश कावले, राहुल कावडे, विवेक चापले, जय चव्हाण, दयानंद सट्टा, आकाश काळे, अलका पोपटकर, अरविंद बिसन, शंकर इंगोले, सुरेश खर्चे, रवींद्र कुथे, अजय धर्म, अमोल हाडके, सुरेंद्र मेश्राम, सचिन लोणकर, संतोष वैद्य, प्रशांत निलाटकर, बनते पंजासिम. रवींद्र शेलकर. धीरज आगाशे. प्रतिक बावांकर. सुनील गोरेडकर. अरुण सनन. राकेश उराडे. निलेश सिंग गहलोट. गिरीश तीतरमारे. पियुशा अकरे. कृतल वेलेकर . अखिल भगत. दीपक भटकारे, रोशन डोंगरे, नितीन रामटेके, सुशांत बोरकर, राकेश खोबागडे, निशांत मेश्राम, रवींद्र घिडौडै, नरेश साखरे, उमेश बेंदेकर, मनोज वरघत, सचिन पारधी, निखिल मेडवड़े, चंद्रशेखर ढोभले, इम्तेयाज़ अली, नरेन्द्र कोल्हे, विशाल चौधरी.