सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांना आयटक मार्फत निवेदन. इमारत व ईतर बांधकाम कामगारांना तातडीनं योजनेचा लाभ देण्याची मागणी.

0
301

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

चंद्रपूर :- इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कोविड -19 यां विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत 2 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून पहिला हप्ता एप्रिल 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै 2020 पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. परत दुसरा 3 हजार रुपयाचा हप्ता आगस्ट मध्ये मंजूर करून बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

परंतु चंद्रपूर जिल्यात प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणा यामुळे जिल्यातील 35 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार अजुनही वंचित आहेत. तेव्हा या सर्व बांधकाम कामगारांना तातडीने मदत मिळावी म्हणून आयटक संघटनेचे कामगार नेते कॉ विनोद झोडगे यांनी दखल घेत जिल्यातील हजारो बांधकाम कामगार यांच्या लेखी तक्रारी घेऊन दि 27 आगस्ट 2020 रोजी मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी कामगार अधिकारी मा. बारई व जावेद यांनी उर्वरित कामगारांचे लवकरच पैसे जमा करण्यासाठी आनलाईन यादी करून इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी बोर्डाकडे पाठवीन्याचे मान्य केले.

वास्तविक मागील तीन वर्षा पासुन बांधकाम कामगारांनाचे उदा. मुलांचे शिष्यवृत्ती, मयत कामगारांच्या विधवा महिलांना आर्थिक सहाय्य, अवजारे खरेदी करिता 5 हजार रुपये, घरकुल करिता दोन लाख रुपये आदी योजनाचे लाभ मंडळामार्फत दिल्या गेला नाही. एक वर्ष झाले महाराष्ट्र मध्ये महापूर, विधानसभा, लोकसभा निवडणूक आणि आता कोरोणा लाॅकडाऊन काळामध्ये ही सरकारी कामगार अधिकारी कार्यालये बहुतांशी वर्षभर बंदच आहेत. म्हणून जो पर्यंत आनलाईन यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे सुरु होत नाही. तो पर्यंत पूर्वीप्रमाणेच सर्व कामकाज सूरू करून कामगारांना नोंदणीचे अधिकार व त्यांचे थकीत लाभ कामगारांना देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदन देतांना आयटक संलग्न असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ विनोद झोडगे, जिला सचिव कॉ नामदेव नखाते, सिंदेवाही तालुकाध्यक्ष कॉ श्रीधर वाढई, सावली तालुकाध्यक्ष कॉ मनोज घोडमारे, चंद्रपूर शहर कॉ नजरीन भाई, राजू कुलकर्णी, जिवती तालुकाध्यक्ष कॉ कृष्णा चव्हाण यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.