मुरबाडमध्ये ४१७२ माहेरवाशिन गौरी- पाच दिवसाचे गणपती बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन!

0
90

मुरबाड दि.२७(सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील मुरबाड पोलिस ठाणे व टोकावडे पोलिस हद्दीतील ४१७२ माहेरवाशिन गौरी तसेच पाच दिवसाचे गणपती बाप्पांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांनी सोशल डिस्टन्स पालन करून तसेच कोणत्या प्रकारची मिरवणूक नाही, गुलाल नाही, बँजो नाही, फटाके नाही अशा साध्या पणात तालुक्यातील टोकावडे, धसई, म्हसा, सरळगाव, शिवले, आदिवासी पट्ट्यात तसेच मुरबाड परिसरातील आपल्या गाव वाईज तलाव, नदी ओढ्यात गौरी गणपती बाप्पाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. त्याच वेळी गणेशभक्तांनी गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा भावनिक शब्दात पाच दिवसाच्या गणरायाला तसेच माहेरवाशिन गौरव बाईला भावपूर्ण निरोप दिला.
तसेच कोरोनाच्या काळात प्रथमच यंदा तालुक्यातील विविध ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन गणेश भक्तांनी अक्षरशः तंतोतंत पडल्याचे दिसून येत आहे. तसेच पाच दिवसाच्या गणेशोत्सव काळामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती पोलीस ठाणे तसेच टोकावडे पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे मात्र सतत चार दिवस पाऊस पडत असल्याने गणेशोत्सवावर पावसाचे सावट दिसून दिसून येत होते मात्र गणेश विसर्जनवेळी पावसाने अक्षरक्षा उघडझाप दिल्याने गणेश भक्ताला विसर्जन कर गणेश भक्तांना गौरी गणपती विसर्जन करताना पावसाने चांगलीच मोकळीक दिली होती.