गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील 44 कोरोना बाधितांसह आज 56 नवीन कोरोना बाधित, 2 जण कोरोनामुक्त

0
189

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली (जिमाका दि.27): चामोर्शी येथे प्रतिबंधात्मक क्षेत्रातील काल सायंकाळी 16 आज 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच चामोर्शी येथील 1 लॅब कामगारही बाधित झाल्याने तालुक्यातील 44 कोरोना बाधितांसह जिल्हयात 56 बाधितांची नोंद झाली. उर्वरीत तालुक्यांमध्ये यात अहेरीचे विलगीकरणातील 4, गडचिरोली 5 यात ब्रहमपुरी येथून आलेला1, सरोदे वार्ड मधील 2, बुलढाणा प्रवासी 1 व सामान्य रूग्णालयातील रूग्ण यांचा समावेश आहे, वडसा तालुक्यातील 2 एसआरपीएफ व कुरखेडा मधील 1 दुकान दार असे आज 56 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज आष्टी व आरमोरी येथील एक एक रूग्ण कोरोनामुक्त झाला.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 152 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 839 तर एकुण बाधित संख्या 992 झाली.