मायावृक्ष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृव स्पर्धेचा निकाल घोषित

0
1041

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून त्यांना हक्काचं व्यासपीठ तयार करून देण्यासाठी व अश्या अनेक उदेशांना समोर ठेऊन लॉककडाऊन काळात स्थापन झालेल्या मायावृक्ष प्रतिष्ठान ने 11जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून कु.संप्रदा जगन्नाथ चटप,म्हातारदेवी (चंद्रपुर) हिने प्रथम क्रमांक पटकविला आहे संप्रदा वेकोलि वसाहत म्हातारदेवी येथील रहिवासी असून कृषी विभागातील पदवीधर विद्यार्थिनी आहे.आजवर तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन तिने अनेक ठिकाणी पारितोषिके मिळवली आहे परंतु या स्पर्धेत राज्य स्तरावर पहिल्यांदाच तिने भाग घेऊन व प्रथम पारितोषिक पटकावून चंद्रपूर जिल्ह्याचं नाव लौकिक केलं आहे . अनुक्रमे द्वितीय क्रमांकाचा मानकरी अक्षय इळके, कोल्हापूर हा ठरला आहे व तृतीय क्रमांक सौ.भक्ती विशे, ठाणे यांनी पटकाविला आहे.स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध वक्ते .प्रा.दिलीप चौधरी व महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध वक्ते विनय पाटील यांनी केले.स्पर्धेत सम्पूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यातून 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मायावृक्ष प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख अनुप कोहळे यांनी मुख्य भूमिका बजावली यावेळी संस्थेचे अध्यक्ष रोशन कापगते,सचिव रोशन गट्टीवार, सदस्य सुदर्सन साळवे, भूषण ,ऋषभ, गजानन, प्रवीण,पवन, समीर,माधुरी तुराणकार,पायल, तीर्थेश्वरी यांनी देखील मोलाचे योगदान दिले.यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विजेत्यांचे व सहभागी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.