घर घेणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारची ची मोठी घोषणा… जाणून घ्या सविस्तर वृत्त

0
228

निलेश आखाडे.
उपसंपादक

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र करण्यात आलेले लॉक डाऊनचा फटका,सर्वसामान्य नागरिकांना,व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसलेला दिसून आला व सर्व आर्थिक व्यवहार खोळंबले.
अनेकांना नोकरी-व्यवसाय गमवावे लागले,पगार कपातीला सामोरे जावे लागले.सहाजिकच या परिस्थितीचा फटका बांधकाम विभागाला ही तितकाच बसलेला दिसून आला. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आपलं हक्काचं नवं घर घेणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने 31 डिसेंबर पर्यंत घर खरेदी वरील स्टॅम्प ड्युटीत कपात केली आहे.आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी पाच टक्क्यांवरून दोन टक्के करण्यात आली आहे.यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना ज्यांना हक्काचे घर घ्यायचे आहे अशांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे.
सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या या निर्णयाने घर खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीशी उत्साहाची लाट येऊन आर्थिक घडी पुन्हा बसू शकणार आहे. याच आशेवर सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपात ही स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे.घर – फ्लॅट खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 वरुन 2 टक्क्यांवर आली आहे.31 डिसेंबरपर्यंत ही सूट असणार आहे.
1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या दरम्यान हीच स्टॅम्प ड्युटी 3 टक्के होईल.यामुळे मंदावलेला रिअल इस्टेट बाजाराला चालना मिळेल अशी आशा सरकारला आहे व या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायिकांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

*दखल न्यूज भारत*