पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

0
76

 

निलेश आखाडे.
उपसंपादक

रत्नागिरी : दहावीनंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुरु असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी ७ सप्टेंबरला तर अंतिम गुणवत्ता यादी १२ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
आतापर्यंत ७२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या तसेच बारावीनंतरच्या प्रथम वर्ष पदवि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला उशीर लक्षात घेता जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे संबंधित विद्यार्थ्यांना प्राप्त करून घेण्यासाठी वेळ मिळण्याचे दृष्टीकोनातून मुदतवाढ दिली आहे.
जेणेकरुन विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ दिली असल्याची माहिती संचालक डॉ. अभय वाघ यांनी संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे दिली आहे. सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा जनक बातमी असून प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.

*दखल न्यूज भारत*