कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील नविन पुलाची नागरिकांची मागणी

0
88

 

प्रतिनिधि
राहुल उके
दखल न्यूज भारत

सडक -अर्जुनी. सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था झाली असून या पुलावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे.जर्जर झालेल्या पुलावर आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाला मोठा खड्डा पडला असून धोकादायक झाल्याने परिसरातील नागरिकांनी नविन पुलाची मागणी आमदारांकडे केली आहे.संबंधित विभागाने दोन-तीन वेळा डागडुजी करून खड्डे सिमेंट काॅक्रीटने बुजविले.मात्र या पुलाचे नविन बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले.या क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी लक्ष घालून सदर मार्गावरील नाल्यावर नविन पुल मंजूर करुन नव्याने बांधकाम करण्यात यावे,अशी या मार्गावरून प्रवास करणारे थाडेझरी,बोळुंदा कोसमतोंडी येथील गावकऱ्यांची आहे.
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या थाडेझरी व बोळुंदा या गावाला जाणारा हा एकमेव मार्ग आहे.याच मार्गावरून कोसमतोंडी येथील शेतकरी बोळुंदा शेतशिविरात जातात.कोसमतोंडी येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत बोळुंदा येथे आहेत.या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार व संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करित आहेत.यावर्षी एप्रिल-मे महिन्यात ऊसाची वाहतूक करित असतांना ऊस भरलेला ट्रक्टर पुलावरून जात असतांनी पुलाला मोठे भगदाड पडून ट्रक्टर पलटला होता. त्यावेळेस सुद्धा संबंधित विभागाने पुलाची थातुरमातुर डागडुजी करून खड्डा बुजविला होता.मात्र या पुलाचे नविन बांधकामाकडे दुर्लक्ष केले.सदर पुल हा जीर्ण झालेला असून या पुलावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे होय. पुलाची दयनीय अवस्था झाली असून पुल कधीही भुईसपाट होऊ शकतो.असे झाल्यास या मार्गावरील रहदारी बंद होईल.पुलावरून ट्रक्टर जात असतांनी पुल हलतो. या पुलावरून ये-जा करणे जिवघेणे झाले आहे.या पुलावर एखादमोठी दुर्घटना होण्याची वाट संबंधित विभाग पाहत आहे काय असे या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.या पुलावर लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठी दुर्घटना होऊन मरणाची तर वाट पाहत नाही ना? अशी जनमानसात चर्चा आहे.