चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1799 मागील 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 132 बाधितांची नोंद तर दोन मृत्यू

0
373

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक शंभराहून अधिक वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1799 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1081 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 696 बाधितांवर उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 1667 बाधितांची संख्या होती. आज सायंकाळपर्यंत 1799 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यात 19 मृत्यूची नोंद झाली आहे अन्य जिल्ह्यातील देखील तीन मृत्यू जिल्ह्यात झाले आहे.
आज मृत्यू झालेला व्यक्ती चंद्रपूर शहरातील 60 वर्षीय पठाणपूरा वार्ड येथील वक्तीचा मृत्यू झाला.
तर दुसरा मृत्यू बल्लारपूर येथील मौलाना वार्ड येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला.