चामोर्शी येथे 13 अगरबत्ती उद्योजकांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप

0
92

अशोक खंडारे उपसंपादक
गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक उद्योग निर्मिती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन मेक इन गडचिरोली चे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ, देवरावजी होळी यांनी मेक इन गडचिरोली च्या वतीने चामोर्शी येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित “उद्योग पर्व” या नव उद्योजक , तरुण व बेरोजगार यांच्याकरिता उद्योग- व्यवसाय विषयक ऑनलाईन गुगल मिट कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना केले ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रंबंधक बोरकर , टेंभूर्णे, जिल्हा कृषी अधीक्षक बोराटे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योग व्यवस्थापक ब कौश्यल्य विकास विभागाचे खंडाळे , सहआयुक्त,नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक चौधरी, जिल्हा मत्स्य व्यवसाय आयुक्त वैद्य उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते मेक इन गडचिरोली चे 13 अगरबत्ती उद्योजकांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले तसेच मेक इन चे मुख्य प्रवर्तक डॉ देवराव होळी यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला मेक इन गडचिरोलीचे कार्यक्रम संचालक श्रीनिवासन दोंतूलवार ,तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे , आशिष पीपरे ,प्रतीक राठी राकेश आर्या ,सुनील सोरते,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले, शेकडो उद्योग- व्यवसाय प्रेमी लोकांनी ऑनलाईन गुगल मिट कार्यक्रमात सहभाग घेतला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेक इन गडचिरोली चे जिल्हा संयोजक रमेश अधिकारी तर प्रास्ताविक तांत्रिक व्यवस्था गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख आनंद खजांजी व आभारप्रदर्शन प्रकाश भाऊ गजपुरे यांनी केले .