आरमोरी विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पार्टी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

0
219

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत

आरमोरी – आरमोरी विधानसभा बसपा अंतर्गत आरमोरी, वडसा, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्याचा बसपा पदाधिकाऱ्यानी दौरा करून तालुक्यातील संघटनेवर जोर देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
आरमोरी तालुका अध्यक्ष विनोद वरठे, आरमोरी तालुका सचिव चंद्रशेखर साखरे, वडसा तालुका अध्यक्ष प्रितम धोगडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष प्रकाश उके, कुरखेडा तालुका सचिव जिवन साखरे, कोरची तालुका अध्यक्ष जयदेव सहारे, कोरची तालुका सचिव संजय नंदेश्वर. या निवडी प्रदेश सचिव रमेश मडावी, जिल्हा अध्यक्ष शंकर बोरकूट, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पेंदाम, जिल्हा सचिव राजेश लिंगायत, विधानसभा अध्यक्ष कृपानंद सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती दौऱ्यासंदर्भात विधानसभा महासचिव दिनेश वालदे, विधानसभा कोषाध्यक्ष जयद्रय बोदेले, विधानसभा संयोजक तुळशीदास नंदेश्वर, जेष्ठ कार्यकर्ते संजय मोटघरे, यशपाल बनसोड, ईश्वर बारसागडे, सुधीर मेश्राम, बाबा पडवेकर, लक्ष्मण नागदेवते, कोटागले सर, सुधीर बोदेले, प्रशांत दोनाडकर, यांनी विशेष सहकार्य केले.