शांततेत पार पडला चामोर्शी चा जनता कर्फ्यू

0
151

उपसंपादक/अशोक खंडारे
आज चामोर्शी येथे जनता कर्फ्यू शासनाच्या वतिने आयोजित करण्यात आला होता त्याला ग्रामस्थांनी व परीसरातील जनतेनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.आठवडी बाजाराचा दिवस असतांनाही सर्व व्यापारी प्रतिष्ठाने लहान सहान दुकान बंद होती जनतेच्या सहभागातून जनता कर्फ्यू शांततेत पार पडला चामोर्शी शहरातील केवट मोहल्ल्यासह शहरातील अन्य भागात काल एकाच दिवशी17 पझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली होती आज 27 अॉगष्ट रोजी प्रशासनाच्या वतीने चामोर्शी शहरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती नगर पंचायत चे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी दिली होती. आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या तपासणीत चामोर्शी शहरात17 कोरोना पझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी चा उपाय म्हणून शहरात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला आहे. पोलीस प्रशासनातर्फे माईकच्या माध्यमातून सर्व जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.27अॉगष्ट रोजी चामोर्शी शहरात दवाखाना आणि औषधी दुकानेच सुरु होते.