
दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कोविड 19 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विज ग्राहकांना विज बिलासबंधी येणाऱ्या अडचणी विविध तक्रारी यासाठी विज ग्राहकांना महावितरण कार्यालयात येण्या जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून खल्लार महावितरण उपकेंद्राअंतर्गत”एक गाव एक दिवस” महावितरण आपल्या दारी हि मोहीम विज ग्राहकांसाठी राबविण्यात आली
आज दि 27 ऑगस्टला हि मोहीम ग्राम पंचायत कार्यालय खल्लार येथे राबविण्यात आली या मोहिमेत खल्लार उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील विज ग्राहकांना त्यांच्या विज बिलासंबंधी अडचणी, तक्रारी समजून घेण्यात आल्या व त्याचे निराकरण करण्यात आले या मोहिमेला विज ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला
यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री मोहोकारसाहेब, खल्लार उपकेंद्राचे उपअभियंता श्री निखिल पडोळे, प्रितम चांदेकर, श्री तुरखेडेजी, पवार, धवने, धाबाडे, होले, लिंगोट तसेच कर्मचारीवर्ग सर्वश्री ठाकरे, समीर शाह, चापके, सचिन रोडे, खिरकर, कु पवार, सहारे, ढोके, जानोरकर, सातारकर, अवघाते वाघ उपस्थित होते