इंदापूर तालुका प्रतिनिधी,
बाळासाहेब सुतार दिनांक:- 27
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत कृषी कन्येने गलांडवाडी नं- १ तालुका इंदापूर येथे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या श्वेता मोहन नलावडे हिने शेतकर्यांना माती परीक्षणाचे महत्व सांगून मातीचे नमुने घेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
रासायनिक खतांचा वाढता वापर, पिकांची फेरपालट याचा अभाव, मातीतील रासायनिक घटकांचे वाढते प्रमाण, जैविक खतांचा अपुरा वापर यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील कमी होत आहे, यासाठी माती परीक्षण करून मातीमधील मूलद्रव्यांची पातळी तपासून त्याच्या अहवालानुसार खतमात्रा देणे फायदेशीर ठरते असे यावेळी सांगण्यात आले.
यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जे .नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम. एकतपुरे ,
कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस .आर .अडत प्राध्यापक डी. एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160