२९ आँगस्ट ला कोराडी जगदंबा देवस्थान येथे भाजपा नेता बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ” घंटानाद आंदोलन “

0
127

 

कोराडी / नागपुर : २७ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोराडी येथील सुप्रसिद्ध जगदंबा देवस्थान येथे दि. २९ आँगस्ट २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता भाजपा चे प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली “दार उघड, उद्धवा दार उघड ” घंटानाद आंदोलन होणार आहे.
राज्यातील मंदिरे उघडी करावी या मागणीसाठी विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन ठाकरे सरकार ला इशारा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.