नेरी येथील प्राथमीक आरोग्य केंद्राचा चा भोंगळ कारभार

0
230

 

प्रतिनीधी /शुभम पारखी

नेरी येथील वार्ड क्रमांक पाच मधील दर्शना लक्ष्मण दडमल ही महिला बाळंतपण करण्याकरीता नेरी पीएससी येथे मंगळवारला बाळंतपणाच्या वेदना होत असल्याने ती नेरी प्राथमीक आरोग्य केंद्रा मध्ये दाखल झाली ,असता नेरी पी एस सी येथील अधिकारी डॉक्टर हे हजर नव्हते. आणि जेव्हा त्यांना यांची माहिती मिळाली ते अर्ध्या तासाने त्या ठिकाणी आले असता त्यांनी त्या पेशंटला हात सुद्धा न लावता प्राथमिक औषधोपचार न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली नाही आणि १०८ क्रमांकाला फोन सुद्धा केला नाही. आणि नेरी पीएससी ची ॲम्बुलन्स सुद्धा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिली नाही आणि तुम्ही या व्यक्तीला चंद्रपूरच्या दवाखान्यात न्या असे सांगून आपले हात त्या पेशंटला न लावता आपले हात त्यांनी झटकले हे सर्व त्यांच्या परिवाराने तीथे असताना पाहिले .तिच्या या त्यांना वेदना पाहन होत नव्हत अश्या तच त्यांना काही सुचले नाही त्यांनी प्रायव्हेट गाडीने चिमूर पीएससी केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी नेरी पी एस सी च्या डॉक्टराचा हा हलगर्जीपणा आहे असे म्हटले आणि तिच्यावर उपचार केले असता तिला जुळे मुले झाले त्यांची प्रकृती चांगली आहे योग्य वेळी जर तिला उपचार मिळाला नसता तर त्या दोन बाळाचे आणि आईचे आरोग्य धोक्यात आले असते परंतु या हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर वर अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे तसेच आरोग्य समितीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच लोक प्रतिनिधींनी यावर जाब विचारावा कारण हे त्यांच्याच बरोबर होत नाही तर आज ही पीएससी मदर पिएसी या नावाने या नेरी परिसरामध्ये ओळखले जाते आणि या पी एस सीमध्ये खेड्यातील सर्व गरीब जनता या ठिकाणी येऊन आपला इलाज करतात . इलाज करतांना ना हक त्रास सहन करावा लागतो योग्य तो औषध पुरवठा या ठिकाणी राहत नाही . व औषधी वीतरक ही एक परीचारीका असते . पेंशटच्या आजाराशी येथे खेळ चालु आहे . लसीकरण योग्य त्या वेळेत होत नाही तरी याकडे आपण जातीने लक्ष द्यावे अशी मागणी नेरी गावकरी करीत आहे