प्रवासी ई पास रद्द करणे व वाहन चालकांच्या समस्या सोडवा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जय संघर्ष वाहन चालक संस्थांची निवेदनाद्वारे मागणी… — ई-पास रद्द करण्यासबंधाने २ सप्तेंबरला राज्यभर आंदोलन.

0
198

अर्जून राठोड
शहर प्रतिनिधी औरंगाबाद..
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय यांना प्रवासी वाहतूक इ पास रद्द करणे व वाहन चालकांच्या समस्या सोडवण्या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदन आज देण्यात आले.
कोरोणा काळात मागील पाच महिन्यापासून सर्व सरकारच्या आदेशाला प्रवासी वाहतूकदार पालन करीत आले आहे,परंतु आपल्या आदेशाने एसटी महामंडळाच्या पास सक्ती रद्द करून नुकतीच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.मात्र इतर खाजगी व टॅक्सी प्रवासी वाहनांना ई पास सक्ती कायम ठेवण्यात आल्याकारणाने खाजगी वाहन व टॅक्सी प्रवासी यांना ई पास सक्ती चे आदेश मागे घेण्यात यावे.तसेच जिल्ह्याबाहेर व संपूर्ण राज्यात प्रवासास मुभा देण्यात यावी दुसरा विषय अपघात समय जनतेकडून तसेच परिवहन अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडून वाहनचालकास होणाऱ्या मारहाणीस कायदेशीर प्रतिबंध करण्यात यावे.
वाहन चालकास असंघटित कामगार वर्गात समाविष्ट करण्यात यावे, बांधकाम मजुरांना लागू असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ वाहन धारकास पण देण्यात यावे व वाहनचालकांच्या सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने वाहनचालकांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी या मागण्यासंदर्भात मागील तीन वर्षापासून आमच्या संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे रस्ता रोको मोर्चा द्वारे लोकशाही मार्गाने कायद्याच्या अधीन राहून सतत पाठपुरावा करण्यात येत असून देखील आश्वासनाच्या पलीकडे सरकारकडून काहीच दिले गेले नाही असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वरील मागण्यांची पूर्तता सरकारकडून लवकरात लवकर करण्यात यावी,अन्यथा दिनांक 02 सप्टेंबर 2020 रोजी,जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था तर्फे राज्यभर एसटी बस रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.तसेच 17 सप्टेंबर 2020 रोजी ड्रायव्हर डे च्या दिवशी सिडको चौक औरंगाबाद येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था तर्फे देण्यात आले.
निवेदनाच्या वेळेस जय संघर्ष वाहन चालक संस्था संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांनी ही माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थिती संजय माणिकराव हाळनोर,संतोष काळवणे,रविंद्र शेळके,अर्जुन राठोड,लक्ष्मण सोनवणे, निखिल कुलकर्णी,सुनिल आप्पा लिंगायत,लक्ष्मण वाघ बाबरेकर,सुनील भिंगारे, कल्याण औताडे, रवींद्र देवरे, विनोद रोकडे इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व संस्था सदस्य यांची उपस्थिती होती.