बिग ब्रेकिंग कोरची येथील अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या नराधम आरोपीस अखेर केली पोलिसांनी अटक

0
630

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

कोरची:-

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीस अखेर आज पोलिसांनी अटक केली.

आरोपी किरण प्रकाशचंद्र अग्रवाल (38) मु.कोरची असे आरोपीचे नाव आहे. घरकाम करण्याऱ्या आदिवासी मुलीचा अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून सदर आरोपीने त्या आदिवासी मुलीवर मातृत्व लादले होतेे. या प्रकरणांमध्ये जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. सदर मुलगीची वैद्यकीय चाचणी घेतली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे शासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला नव्हता .ही वार्ता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पसरल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती.

अखेर पोलिसांनी 23 आगस्ट ला अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि 376 (2)(जे)सह पोस्को कायदा कलम 4 कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

सदर आरोपी एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जवळचा नातेवाईक असल्यामुळे गुन्हा नोंद होऊन सुद्धा तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या आरोपीला अटक करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केला होता .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर यांनी या प्रकरणाकडे स्वतः लक्ष देऊन पीडित मुलगी आणि तिच्या वडीलाचे बयान नोंदविले. त्यानंतर पोलीस यंत्रणेने वेगाने तपासचक्रे फिरवून आरोपी किरण प्रकाशचंद अग्रवाल यांना अटक केली त्यांच्यावर भादंवि 376 आणि पोस्को कायद्याबरोबरच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलम लावण्यात आली आहे. आज आरोपिला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती श्री. भंवर यांनी दिली .

या कामगिरीमुळे जयदत्त भंवर यांचे जिल्हाभरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.