अवैद्य दारू विक्रीची तक्रार करणाऱ्या इसमाच्या घरात घुसुन पती पत्नीवर जीवघेणा हल्ला ,पत्रकार परिषदेत कारवाई करण्याची मागणी,अन्यथा ठाण्यासमोर उपोषन

0
916

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

मारेगांव शहरातील प्रभाग क्र.१३ मध्ये मोठ्याप्रमाणात अवैद्य दारु सुरु असल्याने यावर स्थानिक पोलिसांचे मात्र दूर्लक्ष होत होते. परिणामी होणाऱ्या त्रासाला कंटाळून दरम्यान मारेगाव पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांना अवैध दारू विक्री बंद करण्या बाबत निवेदन दिले असल्याच्या कारणावरूनच मला व माझ्या पत्नीला घरात घुसून अवैध दारू विक्रेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप स्थानिक विश्राम गृह मारेगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनिल गेडाम यांनी आरोप केला आहे.
शहरात प्रभाग क्र.१३ मध्ये गेल्या अनेक महिन्या पासून अवैध दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले होते. मात्र पोलीस प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा गेडाम दाम्पत्याने केला. दारू विक्रीमुळे प्रभागात होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनिल गेंडाम यांनी पुढाकार घेऊन तक्रारीवर नागरीकांच्या साक्षरी घेऊन, मारेगाव पोलीस स्टेशन येथे भेटी दरम्यान आलेल्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना निवेदन दिलें.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे पथकाने व मारेगाव पोलिसांनी प्रभागात धाड टाकली असता सदर अवैध दारू व्यवसायिकांच्या घरातून देशी दारू जप्त करून कारवाई केली. त्यावरून प्रभागातीलच अवैध दारू विक्रेत्यानी तक्रार कर्ता अनिल गेडाम व त्यांचे पत्नीला घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही गटावर मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यात अवैध दारू व्यावसायिक सिडाम परिवातील सदस्यांनी तक्रार कर्ता अनिल गेडाम व पत्नी रसिका गेडाम यांचे वर घरात घुसुन मारहान केली.या मारहानीत अनिलचा डावा हात फँक्चर झाला आहे. पती पत्नीला मारहान करणार्या अवैद्य दारु व्यवसायीकावर योग्य कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशन समोर परिवारासह उपोषनास बसणार असल्याचा इशारा अनिल गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिला.