बनावट पास तयार करून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न

0
596

गुन्हा दाखल
उपसंपादक/ अशोक खंडारे

गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये यामुळे या कारणास्तव जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची व वाहनांची कसून चौकशी करण्याचे निर्देश असतानासुद्धा काही नागरिक बनावट पास तयार करून जिल्ह्यात प्रवेश करण्याचे प्रयत्न करताना त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आले असून यांप्रकर्णी तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 12/08/ 2020 ला चारचाकी वाहनाने दुसऱ्याच्या नावे असलेली ई पास चा वापर करून जिल्ह्यात प्रवेश करताना आरमोरी वैनगंगा नदी चेक पोस्ट वर चौकशी केली असता वाहन मध्ये असलेले प्रवासी व ई पास मध्ये असलेल्या नावांमध्ये तफावत आढळल्याने नितीन विठ्ठल चिलमवार वय 34 वर्ष राहणार शिवाजीनगर गडचिरोली, अमर बबनराव पातारकर वय 29 वर्ष रा गडचिरोली यांच्या वर कार्यवाही करण्या संदर्भात अहवाल तयार करण्यात आला तर दुसरी घटना वैनगंगा नदी चेक पोस्टवर दिनांक 13 8 2020 रोजी सायंकाळ सुमारास नामे भाग्यवान गणपत मोहुर्ले वय 37 वर्षे राहणार आष्टा तालुका आरमोरी यांनी इ पास ची तारीख बदलून जिल्ह्यात दुचाकी वाहनाने प्रवेश करताना चौकशीअंती ती पास बनावट असल्याचे चेक पोस्ट वर असलेले कर्मचारी यांच्या निदर्शनास आले यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अशोक तांगडे नाका चेक पोस्ट अधिकारी यांनी तहसीलदार आरमोरी यांच्याशी संपर्क करून कारवाई संदर्भात अहवाल तयार करण्यात आला या अहवालावरून तहसील ऑफिस नायब तहसीलदार योगेंद्र चापले यांनी आरमोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली दि 20/08/2020 ला आरमोरी पोलिसांनी कलम भा द वि 465, 468, 471, मपोका कलम 37 (3), साथरोग अधिनियम 2,3,4, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 52 कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात एपीआय पंकज बोंडसे, एपीआय चेतनसिंग चव्हाण हे करीत आहे.