रमाई घरकुल योजनेअंतर्गत निधी तात्काळ द्या. जिल्हा परिषद सदस्य संपत आडे यांची मागणी अन्यथा आंदोलन करणार

0
169

उपसंपादक/अशोक खंडारे
गडचिरोली जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलित बांधवांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजना ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून मात्र या रमाई घरकुल योजनेतील एक वर्षापासून चा निधी हा लाभार्थ्यांना मिळालेला नाही अनेक लाभार्थी आपल्या घराचे बांधकाम कसे तरी पैसे जमा करून आपल्या जवळच्या पंचायत समितीकडून कडून बांधकाम केले तरी पण महाराष्ट्र शासनाने या घरकुल लाभार्थ्यांना रमाई योजना अंतर्गत असलेला निधी अजून पर्यंत देण्यात आलेल्या नसल्याने या घरकुल बांधवावर उपासमारीची वेळ आता निर्माण झालेली आहे यासंदर्भात वैरागड मानापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य श्री संपत आळे यांनी वारंवार पाठपुरावा केला असताना सुद्धा या निधीचा अजून पर्यंत वितरीत करण्यात आलेला नसून हा निधी तात्काळ या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा अन्यथा पर्यायाने नाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेला आहे