गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा हल्लाबोल चामोर्शी शहरात एकाचवेळी 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह उद्या 27 ऑगस्टला चामोर्शीत शहरात जनता कर्फ्यू लागू चामोर्शी परिसरात खळबळ

0
270

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत
9518913059

चामोर्शी:-
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करूनही चामोर्शी शहरात आज 26 ऑगस्ट रोजी 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली असून स्थानिक प्रशासनाने उद्या 27ऑगस्ट रोजी चामोर्शी येथे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.
जनता कर्फ्यू दरम्यान शासकीय कार्यालये, दवाखाने व औषधी दुकाने सुरू राहतील. याव्यतिरीक्त संपूर्ण बाजारपेठ बंद राहिल. दरम्यान नागरीकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
चामोर्शी शहरात अचानक संसर्ग वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 16 जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. यामुळे आणखी रूग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी जनता
कर्फ्यूचे पालन करावे असे स्थानिक प्रशासनाने कळविले आहे.