नरसाळा येथिल विवाहित शेतकरी पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केली मुलाच्या आत्महत्या मुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर मारेगाव तालुक्यातील आत्म्हतेची एकाच दीवशी दुसरी घटना

0
239

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील शेतकरी पुत्र महादेव तुकाराम गोवर्धन यानी विष प्राशन करून आत्महत्या केलीत.
सविस्तर माहीती असी की महाराष्ट्र शासना कडून त्यांच्या वडिलांना शिलींग ची जमीन मिळाली होती.त्या शेतीत कष्ट करून कुटुंबाची उपजीविका करीत होते. काही वर्षा पूर्वी वडिलांचा म्रुतु झाल्याणे व घरातील मोठा मुलगा असल्याने सर्व भार हा आत्महत्या करणाऱ्या मुलावरच होता. त्यांच्यावर बँकेचे कर्ज सुद्दा असून हतूसने कर्ज काढून त्यांनी शेती केली होती.त्याला जोड म्हणून कुटुंबातील सदस्य रोज मजूरी करून त्याला हातभार करीत होते. कर्जाचा डोंगर वाढतच होता. यांची चिंता तो दोन तीन दिवसा अगोदर पासून करीत होता. पण ही बाब घरच्यांचा लक्षात आलीच नाहीत.
दि. 26/08/20 ला तो दिवसभर शेतात काम करून घरी आला व घरी कोणीही नसतनी विष प्राशन करून फिरू लागला. घरच्यांना वाठाले की दारू पिऊन असेल. म्हणून त्या कडे दुर्लक्ष केलेत पण जेव्हा तोंडाला फेस आल्याचे दिसले तेव्हां त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे भरती केले. उपचार सुरू असताना उपचारा नंतर त्याला म्रुतु घोषीत करण्यात आले.
त्याच्या परिवारात त्यांची विधवा आई,पत्नी, दोन मुली, व विवाहित भाऊ असा परिवार आहेत. त्याचा म्रुतु मुळे सर्व परिवार कुटुंबाचा कर्ता व्यक्तीच सोडून गेल्याने त्याची हिंमत खचलेल्या परीस्तीथीत समवल्या गेला आहेत. त्या कुटुंबाला शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केल्याचे दिसत आहेत.