बाप या नात्याला काळीमा फासणारी घटना मुलीवर अत्याचार , बापाला अटक

0
320

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

संगमेश्वर – मुलीच्या-बापाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघड झाली असून मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या बापाला काल पंतनगर , मुंबई पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील कडवई या त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे . विष्णू तुकाराम ओकटे (४८) असे आरोपीचे नांव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ️घाटकोपर कामराजनगर येथे राहणाऱ्या विष्णू तुकाराम ओकटे याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरात हॉलमध्ये झोपलेल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केला. यानंतर ही मुलगी नेहमी तणावाखाली वावरत होती. लॉकडाऊनच्या काळात यातून सुटका मिळवण्यासाठी मुलगी संगमेश्वर तालुक्यातील कडवई या तिच्या मूळ गावी आली. मात्र काही तरी निमित्त काढून तिचा बाप विष्णूही गावी आला आणि त्याने गावी देखील मुलीवर शारीरिक अत्याचार केले. या सर्व अत्याचारात मुलगी गर्भवती झाली. तिने हे सर्व बहिणीला सांगितले. अत्याचारग्रस्त मुलीने एका मुलाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने हा सारा प्रकार कुमारी माता म्हणून पुढे आला. याबाबत मुलीच्या जबाबावरुन पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे विष्णू तुकाराम ओकटे ( ४८ ) याच्या विरूध्द गुन्हा रजि . नंबर ५३६ / २०२० भादवि कलम ३७६ , ३७६ ( २) ५०६ , ४ , ६ , ८ , १० , १२ नुसार गुन्हा दाखल झाला. काल मंगळवारी पंतनगर पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे येवून आरोपी विष्णू तुकाराम ओकटे याला अटक करुन पुढील तपासासाठी त्याला मुंबईला नेले.

*दखल न्यूज भारत*