कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर
कन्हान (ता प्र): – पारशिवनी तालुक्यातील सोयाबीन पिकाची कृषी व महसुल विभागा व्दारे पाहणी करून सोयाबीन शेतक-यां चा अहवाल शासना ला पाठवुन नुकसान भरपाई मिळवुन द्यावी. असे निवेदन मा तहसिलदार पारशिवनी याना माजी आम दार रेड्डी यांनी देऊन मागणी केली आहे.
यावर्षी सोयाबीन पिकावर किटकां च्या प्रादुभावाने वाढुन पाने, शेंगा खाऊन तसेच अति पाऊसाने पिक पिवळे पडुन शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने मंगळवार (दि २५) ला माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा नेतृत्वात पारशिवनी तहसिलदार मा वरूणकुमार सहारे यांना निवेदन देऊन महाराष्ट्रा होत असलेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकाचे होत असलेल्या नुकसान बाबत माहिती देत या नुकसान ग्रस्त शेतक-यांना महाराष्ट्र सरकार व्दारे मदत करण्यात यावी असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याप्रसंगी गोंडे गाव जि प सदस्य वेंकटजी कारेमोरे,पं स सदस्य नरेश मेश्राम, धर्मेंद्र गणवीर सह भाजप पदाधिकारी, सदस्य व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.