कुरखेडा येथीलआजच्या अँटीजेन रापिड टेस्ट तपासणीत पुन्हा एकाचा अहवाल पॉजिटिव

0
201

कुरखेडा/राकेश चव्हान

कुरखेडा येथे आज उर्वरित व्यवसायिकांची व त्यांचे कडे काम करित असलेल्या कर्मचारी यांची अँटीजेन रपिड टेस्ट तपासणी करण्यात आली आज झालेल्या 46 तपासणीत एकाचा अहवाल पॉजिटिव आलेला आहे.सदर बाधिताला येथील रुग्णाकरिता तयार कोविड सेंटर कोरोन्टीन करण्यात आले आहे.सदर बाधित हा नजिकच्या चिखली येथील रहिवासी असल्यामूळे कंटेंटमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र )ची कारवाई सुरु आहे.सध्या सुरु असलेल्या तपासणी मुळे भितिचे वातावरण कुरखेडा येथे निर्माण झाले आहे.