गुरुपिठ इंग्लिश मिडीयम स्कुल मधिल समिर प्रमोद पत्तीवार याची उतुंग भरारी, पानटपरी चालवुन घेतले १०० पैकी १०० गुन

0
70

 

वणी : परशुराम पोटे

सन २०१९-२० या सत्रामध्ये १२ वित अकाउंट या विषयामध्ये १०० पैकी १०० गुन मिळवुन महाराष्ट् राज्यातुन प्रथम येण्याचा मान मिळवीला आहे.
या विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण राष्ट्माता बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे सतत प्रयत्नशिल असणारी उच्च प्राथमिक गुरुपिठ इंग्लिश मिडीयम स्कुल येथे झाले असुन त्याचे यशाबद्दल संस्थेचे सचिव अरुण खोकले,संकेत खोकले व शुभम खोकले ,शिक्षिका किरण खडतकर,रंजना झाडे,यांनी सत्कार करुन त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे समिर या विद्यार्थ्याला वडील नसल्यामुळे तो पानठेला चालवुन आईला मदत करुन शिक्षण पुर्ण केले.लाँकडाउन मध्ये धान्याची व धनादेश देऊन शैक्षणिक मदत संस्थेचे सचिव अरुण खोकले व शाळेच्या मुख्यध्यापिका यांनी केली.